जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने खारेपाटण येथे कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात ८ ठिकाणी विविध व्यवसायी प्रशिक्षणे घेण्यात येणार

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन विशेष घटक योजना सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग (MCED) यांचे वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील १८ ते ५० वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवक – युवती व महिला – पुरुष यांचेकरीता तांत्रिक विकास प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचशील नगर “बुद्धविहार” येथे कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण शिबिराचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतींना घ्यावा. असे आवाहन जिल्हा उद्योग केद्राच्या समन्वयक सुषमा साखरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. जिल्हा उद्योग केद्राच्या वतीने या जुलै महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकिसरे ता. वैभववाडी येथे गादी व पिशव्या तयार करणे, डिगड ता. कुडाळ येथे गारर्मेंट्स प्रशिक्षण, रेडी ता.वेंगुर्ले येथे

आतिथ्य व्यवस्थापन व पाककला प्रशिक्षण, दांडेली ता. सावंतवाडी येथे अन्नप्रक्रिया प्रशिक्षण,देवबाग ता.मालवण येथे काथ्या उत्पादन प्रशिक्षण, दोडामार्ग येथे मसाले निर्मिती प्रशिक्षण, कुणकेश्वर देवगड येथे आतिथ्य व्यवस्थापन व पाककला प्रशिक्षण आदी ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे शिबिर १ महिना कालावधीचे ठेवण्यात आले असून प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेणाऱ्या बेरोजगारांस प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तसेच १००० रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे. याबरोबरच व्यवसाय करणाऱ्या बेरोजगार युवक युवतींना विशेष मार्गदर्शन करून त्यांना व्यवसायासाठी लागणारे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तरी या शिबिरात सहभाग घेऊ इच्छिणारे व्यक्तींनी किमान ७ वी पास,जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स व ३ पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागद पत्रासह समन्वयक सुषमा साखरे – ७७७४८७६१४९ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!