मालवणात ३२ ग्रामपंचायतींवर महिलाराज

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसीलदार वर्षा झालटे यांच्या उपस्थितीत मंगळवारी तालुका स्कुल सभागृहात झाली. यात ३२ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक बागवे, आनंद तोंडवळकर यांच्यासह अन्य कर्मचारी, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. ऐश्वर्या तोंडवळकर हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे तळगाव, बांदिवडे बुद्रुक त्रिंबक, महिला गोळवण राठीवडे, अनुसूचित जमाती महिला – वराड, नागरिकांचा मागास प्रवर्ग आंबडोस, बांदिवडे खुर्द कोईल, देवबाग, काळसे, खोटले, मिर्याबांदा सर्जेकोट, गोठणे, हेदुळ, चौके, महिला- वायंगवडे, मसदे चुनवरे, वेरळ, पेंडूर खरारे, तिरवडे, कोळंब, वायरी भूतनाथ, पोईप, नांदरुख.

खुला प्रवर्ग तोंडवळी, बिळवस, हडी, महान, शिरवंडे, साळेल, आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ, चाफेखोल, मठबुद्रुक, किर्लोस, वरची गुरामवाडी, चिंदर, माळगाव, आडवली मालडी, देऊळवाडा, पळसंब, तारकर्ली काळेथर, आचरा, घुमडे, वायंगणी, नांदोस, महिला-वडाचापाट, मर्दै, बुधवळे कुडोपी, असगणी, आंबेरी, हिवाळे, रेवंडी, ओवळीये, देवली, मालोंड, रामगड, असरोंडी, धामापूर, श्रावण, कुंभारमाठ, कांदळगाव, कातवड, निरोम, कुणकवळे, सुकळवाड अशी जाहीर करण्यात आली आहे. अनेक गावांमधील सरपंच पदाची आरक्षणे बदलल्याने काही विद्यमानांना धक्का बसला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या यावेळी वाढण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!