फोंडाघाट (प्रतिनिधी) : कुडाळ अन्नपूर्णा इंटरप्राइज चे मालक आणि सारस्वत समाज चे जिल्हाध्यक्ष आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक चंद्रकांत तथा बबन अण्णाजी नाडकर्णी (६६वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले… ते कुडाळ हायस्कूल मध्ये सेवानिवृत्ती शिक्षक, विद्यार्थीप्रिय, ग्राहकाभिमुख व्यक्तिमत्व होते. त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुलगे, सुना,नातवंडे भाऊ – बहीण असा मोठा परिवार आहे. राहत्या घरी सकाळ पासून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी सर्वस्तरातील ग्रामस्थ, राजकीय नेते,कुडाळ नगरपालिकेचे नगरसेवक, सारस्वत समाजाचे पदाधिकारी, सदस्य,तसेच विद्यार्थी, पालक, ग्राहक,आप्तेष्ट यांनी उपस्थित राहुन श्रद्धांजली वाहिली. दुपारी दोन वाजता कुडाळ वैकुंठभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश व निखिलं नाडकर्णी यांचे ते पिताश्री होत. त्यांच्या निधना बद्दल येथे दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
कुडाळचे यशस्वी प्रतितयश उद्योजक चंद्रकांत तथा बबन नाडकर्णी यांचे दुःखद निधन !











