खारेपाटण बीट मधील पोलीस पाटील स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

पी. एस. आय. रवींद्र पन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या पोलीस बिट मधील पोलीस पाटील यांचा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम कणकवली पी. एस. आय. रवींद्र पन्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण पोलीस दूरक्षेत्र कार्यालयात नुकताच संपन्न झाला. यावेळी खारेपाटण विभागातील पोलीस पाटील यांच्या वतीने पी. एस. आय. रवींद्र पन्हाळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रा करीता येथे नव्याने रुजू झालेले पोलीस अंमलदार मिलिंद देसाई व अवधूत गुनिजन यांचादेखील पोलीस पाटील सहकाऱ्यांच्या वतीने चिंचवली गावचे पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रात काम केलेले व सध्या बदली होऊन वैभववाडी पोलीस ठाणे येथे रुजू झालेले खारेपाटणचे माजी पोलीस अंमलदार उद्धव साबळे व चंद्रकांत माने यांचादेखील पोलीस पाटील यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या स्नेहमेळावा कार्यक्रमाला चिंचवली गावचे पोलीस पाटील दिगंबर भालेकर, खारेपाटण संभाजी नगर गावचे पोलीस पाटील ओमकार चव्हाण, खारेपाटण शिवाजीपेठ गावचे पोलीस पाटील अनिकेत जामसंडेकर, शेर्पे पोलीस पाटील विनोद शेलार, कुरंगवणे पोलीस पाटील देवेन गोसावी, बेर्ले पोलीस पाटील रतन राऊत, नडगिवे पोलीस पाटील जितेंद्र मण्यार, साळीस्ते पोलीस पाटील गोपाळ चव्हाण, वारगाव पोलीस पाटील दिलीप नावळे, शिडवणे पोलीस पाटील समीर कुडतरकर, वायंगणी पोलीस पाटील निलेश कदम आदी उपस्थित होते.

यावेळी पी. एस. आय. रवींद्र पन्हाळे यांनी उपस्थित सर्व पोलीस पाटील यांना आपली कर्तव्ये व जबाबदारी या विषयी मार्गदर्शन केले. तर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाचा देखील उपस्थित पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील कर्मचारी यांनी लाभ घेतला.

error: Content is protected !!