खारेपाटण (प्रतिनिधी) : श्री संत सैलानी बाबा गुरुदत्त ट्रस्ट मुंबई ही संस्था समाजातील उपेक्षित घटकांसाठी विविध उपक्रम आयोजित करते. समाजात सर्वांमध्ये भाईचारा निर्माण होवून माणूस सुखी समाधानी व्हावा यासाठी संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने नुकतेच दहिसर येथील संगम डे केअर सेन्टर मधील बालकांना वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जीवन आनंद संस्था आणि सोबती सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहिसर पश्चिम येथे दारिद्र्यामुळे कुटुंबासह पदपथावर राहणाऱ्या नागरिकांच्या मुलांसाठी संगम डे केअर सेंटर चालवले जाते. या केंद्रात मुलांना स्वच्छतेची सुविधा, सकस आहार व अनौपचारिक शिक्षण देऊन त्यांना शाळेत येण्यासाठी तयार करण्यात येते. संगम डे केअर सेन्टर या उपक्रमाचा उद्देशच असा आहे की, रस्त्यावर आज वंचितावस्थेत जीवन जगणारे जे बालक आहेत ते उद्याचे सक्षम आणि सुजाण नागरिक बनावेत, असा आहे.
संगम डे केअर सेंटरमधील या उपक्रमात नुकतेच श्री संत सैलानी बाबा गुरुदत्त ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. श्री संत सैलानी बाबा गुरुदत्त ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्ते विनोद जोईल, साहस संस्थेचे भुषण परब, श्वेता सुर्वे, संतोष सुर्वे, प्रमोद निवंडेकर, शिवदास जोईल, चंद्रहास आहिर, न्यानदेव ओझरे, सुर्यकांत देसाई, गणेश लोकेगावकर, रश्मी चौगुले, भानुदास रेगे यान्चे हस्ते बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
जोईल बाबांचे शिष्य असलेले श्वेता संतोष सुर्वे (शाखाप्रमुख, शाखा क्र.2 दहिसर पुर्व), संतोष बाबुराव सुर्वे व सर्व सैलानी बाबा भक्त परिवाराची या कार्यक्रमाच्या संयोजनात भूमिका राहिली. प्रमोद निवंडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांचेसह सुनिता भंडारी, मिना पटेल, मनाली, सारिका, गोविंद मार्गी, कांचन पाटिल यांची यावेळी उपस्थिती होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास वाढीस लागला असून त्यांच्या शिक्षण प्रवासाला बळकटी मिळाली आहे. जीवन आनंद संस्था आणि सोबती सोशल फौंडेशनतर्फे श्री संत सैलानी बाबा गुरुदत्त ट्रस्टचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.











