सावंतवाडी (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या कडून कै. विकास भाई सावंत यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या माध्यमातून कै. विकास भाई सावंत यांच्या दुःखद निधनाची शोकसभा सोमवार दिनांक 21- जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता राणी पार्वती देवी हायस्कूल च्या हॉल मध्ये ठेवण्यात आली असून सदर शोकसभेला विकास भाईंवर प्रेम करणाऱ्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
कै. विकास भाई सावंत यांच्या सन्मानार्थ अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शोकसभेचे आयोजन











