मुख्यमंत्री चषक भजन स्पर्धेचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार उदघाटन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

कुडाळ (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आयोजित आणि भाजपा सिंधुदुर्ग पुरस्कृत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता महालक्ष्मी सभागृह कुडाळ येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग च्या वतीने प्रथमच जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली आहे. भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने सदर भजन स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे. महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे 9 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 9 या वेळेत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!