कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुका आत्मा च्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भूषण बोडस यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत आभार मानले. देवगड तालुका शेतकरी सल्लागार समिती च्या अध्यक्षपदी भूषण बोडस यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली येथील ओमगणेश बंगल्यावर बोडस यांनी नामदार राणेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, मंडल प्रभारी डॉ अमोल तेली, देवगड तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, माजी सभापती रवी पाळेकर आदी उपस्थित होते.
आत्मा तालुकाध्यक्ष भूषण बोडस यांनी घेतली पालकमंत्री राणेंची सदिच्छा भेट












