कणकवली येथे उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

मंत्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग व कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २२ रोजी सकाळी ११ ते दुपारी 3 या वेळेत कणकवली कॉलेज येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले आहे.यावेळी कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा,मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.तसेच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ : वर्षा कासले,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ : स्नेहल पुजारे,संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ : रिद्धी ठाकूर,महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ : नितीन परब,वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ : विजय पाटील, जिल्हा उद्योग केंद्र,जिल्हा खादी ग्रामोद्योग आदी महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!