मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

भाजपा कणकवली शहर मंडल चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी संपूर्ण राज्यात विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांनी साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कणकवली शहर मंडलच्या वतीने मंगळवार 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता कलमठ ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी केले आहे.

error: Content is protected !!