सामाजिक बांधिलकी जपत १३ युवकांनी केले रक्तदान
वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना रक्तपुरवठा उपलब्ध व्हावा. या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत वैभववाडी येथील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे शेखर रावराणे व सोनाळी गावातील युवा वर्गाने एकत्र येत आज ग्रामपंचायत सोनाळी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे शेखर रावराणे तसेच टेम्पो संघटनेचे शांतेश सुतार, संजय साळसकर, अक्षय गुरव, संकेत साळुंखे, शुभम मालकर, सागर माईंनाकर यांचे या रक्तदान शिबिरात मोलाचं योगदान लाभले. या रक्तदान शिबिरात स्वप्नील कदम, प्रशांत पवार, सुदेश गुरव, स्वप्नील गुरव, साहिल गुरव, महेश गुरव महेश पालकर यांच्यासह एकूण १३ युवकांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला.












