” नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी ” – संत शिरोमणी नामदेव महाराज !

समाज बांधवांतर्फे नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा दिन फोंडाघाट मध्ये उत्साहात !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे फोंडाघाट शिंपी समाजातर्फे श्री देव राधाकृष्ण मंदिरामध्ये, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा दिन उत्साहात पार पडला. त्या निमित्त, विनायक कुबडे दाम्पत्याचे हस्ते, माधव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री सत्यनारायण पूजा पार पडली. त्यानंतर समाज बांधवांनी एकत्र येत, संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे यथासांग पूजन करुन वंदन केले. आरती प्रसादानंतर सायंकाळी वारकरी संप्रदायाचा हरिपाठ उत्साहात पार पडला. “नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी || ” या समतेचा मार्ग दाखविणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या कीर्तनाचे दाखले देत, रात्री स्थानिक भजनांनी हजेरी लावली. समाज बांधव आणि भाविकांनी उपस्थित राहून या उपक्रमांचा लाभ घेतला….

error: Content is protected !!