समाज बांधव राजेंद्र वरुणकर यांचा सत्कार
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील समस्त शिंपी बांधवांच्या वतीने संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची पुण्यतिथी नुकतीच खारेपाटण येथील श्री विष्णू मंदिरात साजरी करण्यात आली. या पुण्य सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील कार्यकर्ते व खारेपाटण व्यापारी असोसिएशचे माजी अध्यक्ष तसेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त तथा प. पू. भालचंद्र महागराज नागरी सह. पतसंस्थेचे संचालक राजेंद्र वरूणकर यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा संत नामदेव शिंपी समाजाच्या कणकवली तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या या अभिनंदनीय निवडीबद्दल खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिर येथे खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख महेश कोळसुळकर व शिवसेना शिंदे गटाचे कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या वतीने राजेंद्र वरुणकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रा.पं. सदस्य सुधाकर ढेकणे, पप्पीशेठ गाठे, राजू गाठे, अवी गाठे, श्री ढेकणे, मनोहर ढेकणे, राजेंद्र ढेकणे, आरती गाठे तसेच इतर शिंपी समाज बांधव उपस्थित होते. संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शिंपी समाज बांधवांच्या वतीने संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले.












