कुडाळ तालुका चर्मकार समाज बांधवांचा ३ ऑगस्ट राेजी विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग तालुका शाखा कुडाळच्या वतीने समाजातील विविध परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता कुडाळ हायस्कूल जवळ मराठा समाज हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण, नवोदय परीक्षा उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, १०वी, १२वी, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी, विविध समित्या, संस्थांवर नियुक्त, शासकीय पुरस्कार प्राप्त, जिल्हा, राज्य स्तरावर गुणवत्ता प्राप्त खेळाडू समाजबांधवांचा ही सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपले नाव व गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सॲप नंबर श्री. रामदास चव्हाण पं. स. कुडाळ नजिक 9823141369 व सचिव नरेंद्रकुमार चव्हाण 9403851877 या नंबर वर २८ जुलै पूर्वी पाठवण्याचे आवाहन तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!