राधारंग फाऊंडेशनच्या वतीने सिंधुदुर्गातील गरजू ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

चौके (प्रतिनिधी) : राधारंग फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात आणि अशाच उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करणे. राधारंग फाऊंडेशन राबवित असलेल्या प्रत्येक योजनेला वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. “अनिल – अनुराधा तिरोडकर सदाप्रेम” योजना ही त्यापैकी एक योजना आहे.

राधारंग फाऊंडेशन आणि डॉ. उर्मिला लाल आणि डॉ. तन्मय लाल यांच्या देणगीतून “अनिल – अनुराधा तिरोडकर सदाप्रेम” योजनेतून डॉ. उर्मिला यांचे वडील कै. अनिल (हरी) सदाशिव तिरोडकर यांच्या 30 जुलै या जन्मदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील माळगाव, बागायत, मसदे, वेरली, वायंगणी, फोंडाघाट, निवती, तेंडोली, कोचरा, वाफोली, डेगवे, भोगवे, चिपी, शिरोडा, केळुस, आजगाव या गावातील एकूण पंचवीस गरजू ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यासाठी राधारंग फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या सर्व कार्यकारणी सदस्यांनी या योजनेसाठी ठरवून दिलेल्या विभागाप्रमाणे योग्य पात्र ज्येष्ठ व्यक्ती निवडून त्यांना भेटवस्तू सुपूर्त केल्या. या योजनेची संपूर्ण जबाबदारी संस्थेच्या सदस्या अरुणाताई सामंत यांच्याकडे होती.

error: Content is protected !!