फोंडाघाट महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक पाहण्यासाठी लोरे हवामान केंद्रास भेट
फोंडाघाट (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव मिळावा यासाठी क्षेत्र पाहणी भेटीचे आयोजन नुकतेच फोंडाघाट महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजाराम पाटील यांनी लोरे येथे असणाऱ्या हवामान केंद्रामध्ये केले होते. हवामान विषयक उपकरणे ही दैनंदिन जीवनाचे सोबती असतात. तसेच हवामान विषयक उपकरणे म्हणजे निसर्गाचे अचूक मूल्यमापन करतात असे प्रा. डॉ. राजाराम पाटील म्हणाले. प्रॅक्टिकल व अनुभव यासाठी फील्डवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी लागते. तसेच भूगोल हा विषय भौगोलिक विविधता जपणारा व माहिती देणारा आहे. हवामान प्रत्येक विभागानुसार तसेच प्रदेशानुसार बदलत असते. हवामानाच्या कार्याची नोंद विविध प्रकारच्या उपकरणांच्या सहाय्याने केली जाते. सर्व संखिकी माहिती कशी ठेवली जाते. २४ तास, हवामान विषयक नोंद करणारी स्वयंचलित काही उपकरणे या लोरे नंबर १ हवामान केंद्रामध्ये आहेत. स्वयंचलित पर्जन्यमापक, साधा पर्जन्यमापक उपकरणाच्या सहाय्याने पर्जन्य किती झाले याची दररोज नोंद ठेवली जाते. त्याचबरोबर तापमान, हवेचा वायुभार, आद्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा अशा हवेच्या विविध विविध अंगांचा अभ्यास करण्यासाठी त्याचबरोबर उपकरणांच्या कार्याची नोंद कशी ठेवली जाते, याची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना समजावून कौस्तुभ रेडकर यांनी सांगितले. शेवटी सपना रासम हिने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी अभ्यास सहलीसाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे व कौस्तुभ रेडकर आणि भगवान सावंत यांचे आभार मानले.













