दशावतार रंगभूमीचा तेजस्वी तारा निखळला

प्रशांत मेस्त्री यांचे विजेच्या धक्क्याने निधन; दशावतार क्षेत्रात शोकसागर

कणकवली (प्रतिनिधी) : दशावतार नाट्यकलेमध्ये आपल्या असामान्य स्त्री भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री (वय ५०, रा. हरकुळ खुर्द, सुतारवाडी) यांचे विजेच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दशावतार रंगभूमीवरची एक तेजस्वी कला ज्योत मालवली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून प्रशांत मेस्त्री यांनी दशावतार क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली होती. स्त्री भूमिकांतील त्यांचा सहजसुंदर अभिनय आणि भावगर्भ सादरीकरण यामुळे ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. त्यांच्या निधनाने दशावतार कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, कलाकार मंडळी व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरून तसेच वैयक्तिक स्तरावरून अनेकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत दुःख व्यक्त केले. प्रशांत मेस्त्री यांच्या पश्चात पत्नी, मुले, वडील असा परिवार आहे.

error: Content is protected !!