रक्षाबंधन निमित्त वृक्ष दिंडी सह शालेय परिसरातील वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
निरोगी आरोग्यासाठी वृक्षसंवर्धन काळाची गरज – जयेंद्र रावराणे.
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आदिवासी दिन व रक्षाबंधन यांचे औचित्य साधून आज शनिवार दि.९ ऑगस्ट, २०२५ रोजी वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात वृक्ष दिंडी, वृक्षबंधन, वृक्षारोपण व रक्षाबंधन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालखीचे पुजन करून प्रशालेपासून दत्त मंदिर पर्यंत वाजत गाजत वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देत प्रशालेच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. त्यानंतर शालेय परिसरातील वृक्षांना कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थीनींनी तयार करून आणलेल्या राख्या उपस्थित मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांना उपस्थितीत बांधण्यात आल्या. त्यानंतर शालेय परिसरात सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी व प्रशालेत सांस्कृतिक विभाग, एन.सी.सी.विभाग, आर.एस.पी.विभाग, हरित सेना विभाग या सर्वांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. प्रशालेच्या वतीने या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. निरोगी आरोग्यासाठी वृक्षसंवर्धन काळाची गरज असल्याचे मत कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. त्यानंतर प्रशालेत उपस्थित सर्व मान्यवरांना विद्यार्थीनींनी राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक विजय रावराणे, शरद नारकर, प्रभारी मुख्याध्यापक पी.एम .पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, मातापालक संघाच्या स्वराली कोलते, सौ.कळसुलकर, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपाल अनिता बोडेकर, अंकीत काशीद , श्रद्धा दामले, तात्या ढवण, जिल्हा तालुका शांतता कमिटी व नाधवडे तंटामुक्त अध्यक्ष परशुराम इस्वलकर, पत्रकार श्रीधर साळुंखे, रविंद्र रावराणे,विनोद रावराणे, प्रताप रावराणे, महेश पाटील, संतोष तांबे, विलास पांचाळ,सांस्कृतिक प्रमुख आर.बी.जाधव,अर्चना परीट, हरित सेना विभागाचे पंडित पवार,प्रशालेचे एन.सी.सी ऑफिसर संदेश तुळसणकर, आर. एस. पी. अधिकारी एस. एस. पाटील, एम.एस.चोरगे. तसेच सर्व प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक एस.बी.शिंदे यांनी केले.












