आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टा येथे 25 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झालेल्या कॅरम स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये 14 वर्षाखालील मुली गटात रेवा पाटील – प्रथम क्रमांक, ईश्वरी त्रिंबककर – द्वितीय क्रमांक तर 17 वर्षाखालील मुली गटात तृप्ती राऊळ – द्वितीय क्रमांक, अनन्या त्रिंबककर- चतुर्थ क्रमांक श्रुतिका साईल – पाचवा क्रमांक तसेच 17 वर्ष मुलगे गटात नैतिक त्रिंबककर – द्वितीय क्रमांक, स्वराज लोके – तृतीय क्रमांक, वेदांत तावडे- सहावा क्रमांक प्राप्त केला. बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षा खालील मुलींमध्ये सेजल राऊत या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, सचिव अरविंद घाडी, सर्व संचालक, मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, एकनाथ गायकवाड, अभिजित धुरे, प्रशांत गोसावी, संतोष मेस्त्री सर्व शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.












