आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूल मध्ये हरीतसेना विभागाच्यावतीने शनिवार दि. ०९/०८/२०२५ रोजी आम्र वृक्षाला नैसर्गिक राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक डी. जे. टकले यांनी मानव व वृक्ष यामधील असणारा सहसंबंध सविस्तर पणे विशद केला. वैज्ञानिक गोष्टींचे भान ठेऊन आपण आपल्या संस्कृतीचे जतन करूया. आज “क्रांती दिन” असल्याने स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकांना प्रथमत: अभिवादन करण्यात आले. प्रशाळेतील सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून बहिण-भावाच्या नात्यातील स्नेहबंधाचा धागा घट्ट केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख छाया कुणकवळेकर यांनी सुनियोजन केले. यावेळी संजय जाधव, केतकी बावकर तसेच शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.












