पं. स. व जि.प.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांचे मार्गदर्शन
लढला नाहीस तरी चालेल पण विकला जावू नको.! या डॉ.आंबेडकरांच्या विधानाची पदाधिकाऱ्यांना करुन दिली आठवण
वैभववाडी (प्रतिनिधी): आज वैभववाडी येथे आमदार वैभव नाईक, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवा नेते संदेश पारकर, सुशांत नाईक या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती वैभववाडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक वृंदावन रिसॉर्ट वाभवे- वैभववाडी येथे संपन्न झाली. यावेळी वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत तसेच जिल्हा पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पं.स.व जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले आपण पदाधिकारी असो किंवा नसो एक शिवसैनिक म्हणुन नव्या उमेदीने आपण पक्षबांधणीचे काम करुया..! एकामेकाचे पाय ओढण्यापेक्षा कोणीतरी आपल्यातलाच मोठा होतोय हे स्विकारून त्याच्या पाठीशी उभे राहुया. परीणामी येत्या काळात पं.स. व जि.प. वर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काल सर्वत्र साजऱ्या झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने सतिश सावंत यांनी ‘लढला नाहीस तरी चालेल पण विकला जावू नको.!’ या डॉ.आंबेडकरांच्या वक्तव्याचा उपस्थित पदाधिकाऱ्यांना दाखला दिला. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील जि.प.मतदारसंघ निहाय दि.२० एप्रिल रोजी कोकीसरे जि.प.मतदारसंघ, दि.२५ कोळपे जि.प.मतदारसंघ. व दि.२१ लोरे जि.प. मतदारसंघ असा नियोजित जनसंपर्क दौरा निश्चित करण्यात आला आहे. कार्यकारिणी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केल्या नंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणाले मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत यांचा मतदारसंघ निहाय दौरा निश्चित केला आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, गॅस, बियाणे -खते यांचे वाढते भाव, काजूला योग्य हमीभाव व अन्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य शासनाला जाग आणण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितले. गगनबावडा घाट रस्त्याच्या बाबतीत कोटीत निधी मिळाल्याचे समजते मात्र गेली कित्येक महिने केवळ आश्वासनेच ऐकतो मात्र आजही घाट रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत घाट मार्गाचे काम सुरू झाले नाही तर त्या विरुद्ध देखील लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैभववाडी शहरातील स्टॉल धारक जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाठीशी निर्भीडपणे उभे राहिले तर स्टाॅल धारकांना देखील न्याय मिळवून देण्याचे आश्वासन सतीश सावंत यांनी दिले. तालुक्यात अनेक कामे होत आहेत. विशेषतः धरणांची कामे मोठ्या प्रमाणात होत असताना प्रकल्पांची कामे निकृष्ट दर्जाची सुरू आहेत, तर काहींना जमीनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही त्यांची बैठक घेऊन त्यांना पैसे लवकर मिळावे म्हणून शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असे मत जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत वैभववाडीत शासन व महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवा नेते संदेश पारकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, तालुकाध्यक्ष मंगेश लोके, महीला आघाडी प्रमुख नलिनी पाटील, माजी जि.प.सदस्य दिव्या पाचकुडे, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, नगरसेविका श्रद्धा रावराणे, सानिका रावराणे, मानसी सावंत तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, उपतालुकाप्रमुख, माजी जि.प. सदस्य,माजी पं.स.सदस्य, विभाग प्रमुख,वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे सर्व आजी-माजी नगरसेवक,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख,बूथ प्रमुख, महिला शाखाप्रमुख, तसेच युवासेनेचे सर्व पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, सोसायटी संचालक आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.