विविध क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात आला सन्मान
कणकवली (प्रतिनिधी) : अल्पावधीतच सिंधुदुर्ग वासियांचा विश्वास संपादन केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल चा द्वितीय वर्धापन दिन सोहळा काल 14 एप्रिल रोजी कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त आपला संदर्भ डिजिटल न्यूज चॅनेलवर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार देखील या निमित्ताने करण्यात आला. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड, कणकवली तहसीलदार आरजे पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, कणकवली च्या प्रथम माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका मेघा गांगण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ओणी येथील वात्सल्य मंदिरचे संचालक डॉक्टर महेंद्र मोहन आणि आशाताई यांना आदर्श सहजीवन पुरस्कार, बांधकाम क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे रघुनाथ नाईक यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार, सिंधु विकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ज्योती किरण गावकर यांना यशस्वी महिला उद्योजक पुरस्कार, मसाला निर्मिती क्षेत्रात उत्तुंग झेप घेणाऱ्या तनवीर मुदस्सरनजर शिरगावकर यांना यशस्वी महिला उद्योजिका पुरस्कार, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महेश कुमार यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता, प्रशासकीय सेवेसोबत लोकसेवा करणाऱ्या मंगेश अनंत राणे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, ज्ञानदानाचे सर्जनशील काम करणाऱ्या भानु केरू गोंडाळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, हसत खेळत शिक्षण देणाऱ्या सुकन्या संजय मुंडे यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, अष्टपैलू अभिनेत्री लेखिका कवयित्री कल्पना बांदेकर यांना कलाभूषण पुरस्कार, आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचे धडाडीचे पत्रकार संतोष यशवंत पाटणकर यांना स्टार रिपोर्टर पुरस्कार, अध्यात्मिकतेसोबत सामाजिक कार्याचा वसा घेतलेले सत्यविजय राजाराम जाधव यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या पतसंस्थेला आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आदर्श गाव मॉडेलचा ध्यास घेतलेल्या वांगणी गावच्या सरपंच अस्मि प्रशांत लाड यांचा देखील विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, महिला प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँक संचालक, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शेतकरी खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रकाश सावंत, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगावकर, सुभाष मालंडकर, पपू पुजारे यांनी जिल्हा कार्यालयात येत संपादक राजन चव्हाण यांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. वर्धापनदिन समारंभात डीवायएसपी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, रोटरी क्लब सेंट्रल कणकवली प्रेसिडेंट वर्षा बांदेकर, रोट्रियन दिपकभाई बेलवलकर, जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे प्रशांत वर्दम, ग्रामसेवक युनियन कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत, ज्ञानदा शिक्षण संस्था सचिव प्रा.हरी भिसे, दै. प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, दै. पुढारी आवृत्तीप्रमुख गणेश जेठे, दै. रत्नागिरी टाईम्स आवृत्तीप्रमुख लक्ष्मीकांत भावे, कोकणशाही डिजिटल न्यूजचे संचालक संपादक साईनाथ गावकर, कणकवली तालुका पत्रकार समिती अध्यक्ष अजित सावंत, माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, उपाध्यक्ष अनिकेत उचले, पत्रकार रमेश जोगळे, विरु चिंदरकर, संतोष राऊळ, तुषार सावंत, चंदू तांबट, सुधीर जोशी, जेष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, प्रथमिक शिक्षक समिती माजी तालुकाध्यक्ष विनायक जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिश्चंद्र सरमळकर समाजातील सर्व स्तरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.