खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावच्या म. गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी या गावचे ग्रामस्थ भाजचंद्र शामू लाड यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. कुरंगावणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात गावचे सरपंच श्री संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळीं कुरंगावणे गावच्या म.गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री भालचंद्र लाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी ग्रा.पं.सदस्य बबलू पवार, विशाखा राऊत, श्री सादिकले आदी मान्यवर उपस्थित होते. तर सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी गावचे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र लाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कुरंगवणे गावच्या म. गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी भालचंद्र लाड यांची निवड










