खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांनी घेतली विनोद तावडे यांची भेट

“खारेपाटण तालुका प्रश्न व खारेपाटण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म साठी प्रयत्न करणार” – विनोद तावडे

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेते विनोदजी तावडे यांची खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. व गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या खारेपाटण तालुका निर्मिती प्रश्नांवर तसेच खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म बांधून देण्याबाबत चर्चा केली. सिंधुदुर्गचे सुपुत्र भाजप नेते विनोद तावडे हे आपल्या कुणकवण येथील मुळगावी गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सपत्नीक आले होते. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांनी त्यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण करणे तसेच खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म उभारणी बाबत चर्चा केली. यावेळी विनोद तावडे यांनी याप्रश्नी संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी संभाजी नगर गुरववाडी विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष सूर्यकांत गुरव नितेश गुरव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!