वैभववाडी (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत १५ जून, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) सहायक प्राध्यापक पदासाठी झालेल्या परीक्षेत योगेश सुधाकर सकपाळ यांनी पात्रता मिळवून यश संपादन केले आहे. शिक्षणशास्त्र (Education) या विषयातून परीक्षा देताना त्यांनी १९० गुण मिळविले. वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचे ते सुपुत्र असून सध्या ते वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण-खवणेश्वर येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाजी विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. ए. अभ्यासक्रमात त्यांच्या समीक्षात्मक लेखाचा पूरक वाचन साहित्य म्हणून समावेश झाला आहे. योगेश सकपाळ यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार व सहकारी शिक्षकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
MH-SET मध्ये प्राथमिक शिक्षक योगेश सकपाळ यांचे सुयश










