सिंधुदुर्गला नवे नेतृत्व : तृप्ती धोडमिसे यांनी पदभार स्वीकारला

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : तृप्ती धोडमिसे यांनी आज जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारत जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली.

या वेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार व आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार विरसिंग वसावे, चैताली सावंत यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक परिचय करून घेत संवाद साधला.

तृप्ती धोडमिसे यांचा प्रवास
◾ IAS प्रशिक्षण (2019-2021) : LBSNAA येथे प्रशासनाचे मूलभूत प्रशिक्षण.
◾ सहायक आयुक्त, GST पुणे : पाच वर्षे महसूल व करसंकलन क्षेत्रात कार्य.
◾ सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, ITDP धुळे (2021-2023) : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत अनेक योजनांची अंमलबजावणी.
◾ मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली (2023-2025) :
1. प्रशासनातील शिस्तीबरोबरच विविध उपक्रम राबवले.
2. २५ जून २०२५ रोजी सांगलीत झालेला ‘जागतिक योग दिन’ उपक्रम पाच लाख नागरिकांच्या सहभागामुळे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदला गेला.
3. ई-ऑफिस प्रणाली अंमलात आणणारा सांगली जिल्हा राज्यात पहिला ठरला.
4. ‘माझी वसुंधरा’ अभियान, ‘माझ्या गावचा धडा’, ‘चला सावली पेरुया’, प्लास्टिक निर्मूलन यांसारखे अभिनव उपक्रम राबवले.
5. आरोग्य सुविधा, ग्रामपंचायत स्तरावरील कामे, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे सांगली राज्यात अग्रगण्य ठरला.

शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी
शिक्षण : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP) मधून Production Engineering मध्ये बी.टेक.
खासगी अनुभव : शासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी लार्सन अँड टुब्रो (L&T), अहमदनगर येथे चार वर्षे औद्योगिक क्षेत्रात काम.

आता जिल्हाधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यभार स्वीकारल्यानंतर, त्यांच्या नेतृत्वाखाली विकास व प्रशासनात नवे उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!