वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय प.पू. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलचे कला शिक्षक मंदार सदाशिव चोरगे यांना जाहीर झाला आहे. कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. सन 2025 सालचा हा आदर्श शिक्षक पुरस्कार चोरगे यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप असून नवी मुंबई येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 7 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता कराडी समाज हॉल कामोठे नवी मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. मंदार चोरगे हे उपक्रमशील कलाशिक्षक असून या अगोदरही त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे
राज्यस्तरीय प. पू. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार मंदार चोरगे यांना जाहीर












