नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पाहण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी…

वैभववाडी (प्रतिनिधी) : नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पाहण्यासाठी जिल्हाभरातील चाकरमान्यांनी गणेश उत्सवा दरम्यान मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काचेचा पूल पाहण्यासाठी तास तासभर लाईन मध्ये राहून चाकरमान्यांनी नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलावरून मनमुराद पर्यटनाचा आनंद लुटला.    

नापणे  धबधबा हा  बारमाही वाहणारा धबधबा म्हणून सुप्रसिद्ध आहे. वर्षभर हा धबधबा पाहण्यासाठी जिल्ह्यात येणारे पर्यटक आवर्जून येत असतात. या धबधब्यावर सिंधू रत्न योजनेतून काचेचा पूल उभारण्यात आला आहे. अशा प्रकारचा काचेचा पूल हा राज्यातील पहिला पूल आहे. त्यामुळे हा पुल पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.   

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गेल्या महिन्यात या याचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यानंतर प्रसारमाध्यमांमधून या काचेच्या फुलाची सर्व दूर पसरलेल्या माहितीमुळे राज्यभरातील पर्यटक काचेचा पूल व या काचेच्या पुलावरून नापणे धबधब्याचे विहंगम दृश्य न्याहळण्यासाठी या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहेत. पुलावरून फोटो, व्हिडीओ शूट करणे, सेल्फी घेणेचा आनंद पर्यटक घेतांना दिसत आहेत.    

नापणे धबधब्यावरील पर्यटकांची वाढणारी गर्दी ही वैभववाडी तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देणारी आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.अशी मागणी पर्यटक करीत आहेत.

error: Content is protected !!