सामाजिक मूल्यांची प्रेरणा जोपत पोदाऱ इंटरनॅशनल स्कूल, कणकवलीच्या विद्यार्थ्यांची संविता आश्रमास भेट

आश्रमचे काम पाहून खूप आनंद झाला – चैतन्या गुरव, विद्यार्थीनी पोदार इन्टरनॅशनल स्कूल

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली येथील पोदाऱ इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या स्वयंसेवा कार्यक्रमाअंतर्गत देणगी मोहीम राबविली व सामाजिक बांधिलकी आणि सेवा मूल्यांची शिकवण देण्यासाठी प्रेरणादायी पाऊल उचलत विद्यार्थ्यांनी अलीकडेच पणदूर येथील संविता आश्रमाला भेट देऊन तेथील बांधवांशी संवाद साधला आणि जीवनावश्यक वस्तू तसेच आश्रमातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळण्यांचे वाटप केले.

या उपक्रमादरम्यान, जीवन आनंद संस्थेचे स्वयंसेवक शैलेंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना निराधार व वंचितांसाठी चालवण्यात येणाऱ्या जीवन आनंद संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या बोलण्यातून विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्त्व समजले. यावेळी संविता आश्रमाचे व्यवस्थापक देवू सावंत आणि आशिष कांबळी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आभार मानले. त्यांनी दिलेल्या वस्तूंमुळे आश्रमातील रहिवाशांच्या दैनंदिन गरजा काही प्रमाणात पूर्ण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोदाऱ स्वयंसेवा कार्यक्रम व देणगी मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती व मदतीची भावना आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर या माध्यमातून ‘समाजाप्रती सद्भावना, काळजी, प्रेम,’ ही मूल्ये विद्यार्थ्यांमधे रुजवण्याचा प्रयत्न शाळेमार्फत केला जात आहे. तर हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शैक्षणिक अनुभव नव्हता, तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजाशी नाते जोडले आणि सामाजिक भान जपण्याचा संकल्प देखील केला. यावेळी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी या स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनाबद्दल पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक करत आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!