ऍड. सिद्धेश शेट्ये यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : 15 हजार रुपये किंमतीचा गांजा आढळून आल्याबद्दल न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी शुभम संतोष गोसावी ( रा. बांधकरवाडी, कणकवली ) याची 50 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली. आरोपी च्या वतीने ऍड. सिद्धेश शेट्ये यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी शुभम गोसावी याच्या ताब्यातील त्याच्या कणकवली शहरातल्या राहत्या घरातून 15 हजार रुपयांचा गांजा एलसीबी च्या पथकाने जप्त केला होता. ही कारवाई 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपी शुभम गोसावी याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान आरोपीच्या वतीने ऍड. सिद्धेश शेट्ये यांनी जामीन मंजूर होण्यासाठी कणकवली न्यायालयात अर्ज दाखल केला होता.त्यावर सुनावणी होऊन कणकवली न्यायाधीश श्री. शुभम लटुरिया यांनी आरोपी शुभम गोसावी याची जामिनावर मुक्तता केली.












