श्रावण येथे रस्त्यावर पट्टेरी वाघाचा मुक्त संचार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली-आचरा मार्गावरील श्रावण येथील कुबल सुपरमार्ट परिसरात पट्टेरी वाघ रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसून आला. शुक्रवारी, ५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

वाघ रस्त्यावरून शांतपणे जाताना नागरिकांच्या नजरेस पडला. पहाटेच्या वेळेमुळे वाहतूक कमी होती, मात्र काहींनी हा प्रसंग पाहून आश्चर्य व्यक्त केले. अचानक रस्त्यावर वाघ फिरताना दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली असून परिसरात गस्त वाढविण्यात येणार असल्याचे कळते.

error: Content is protected !!