कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठ मध्ये एसटी स्टँड नजीक मंथन पान स्टॉल बाजूला मुंबई मटका खेळल्याबद्दल बाबू घुले (रा. कोंडये) आणि मटका घेतल्याबद्दल अतुल रामकृष्ण पारकर (वय 44, रा. बाजारपेठ फोंडाघाट) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारकर याच्याकडून रोख रु. 3020 आणि 9 हजार रुपये किंमतीचा मोबाईल सह एकूण 12 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई फोंडाघाट दुरक्षेत्राचे हवालदार शिवगण, कॉन्स्टेबल सचिन माने यांनी 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता केली. कॉन्स्टेबल माने यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम 887 चे कलम 12 ( अ ) बी एन एस कलम 49 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोंडाघाट मध्ये मटका खेळणारा आणि मटका घेणाऱ्यावर गुन्हा दाखल












