ईद ए मिलद निमित्त कणकवली शहरात मुस्लिम मंच सिंधुदुर्ग तर्फे सरबत वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : इस्लाम धर्मात ईद मिलद ऊन नबी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. ह्यावर्षी पैंगम्बर हजरत सललहू ताला आलेही सलम यांचा 1500 वा जन्म दिवस म्हणून साजरा केला गेला. या निमित्ताने सरबत वाटपचा कार्यक्रम कणकवली शहरातील पटवर्धन चौकात करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. ह्या कार्यक्रम साठी प्रमुख उपस्थिती ऍड. अशपाक शेख, मुराद आली शैख, शानू शहा, मुन्ना निशानदार, अमजद शैख, इबू शैख, मुजफ्फार शेख, आसिफ पटेल, अन्वर शेख, असिफ नाईक, अजीम कुडाळकर, तौसिफ़ बागवान, जाकीर हुडली, शब्दब शेख, सरफराज शेख यांची होती. सकल मराठा समाज तर्फे सुशील सावंत, सकपाळ, सोनू सावंत आदिनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!