आखवणे भोम पुनर्वसन गावठाणात आरोग्य शिबीर यशस्वी

वैभववाडी (प्रतिनिधी) : एस एस पी एम हॉस्पिटल पडवे यांच्या वतीने आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाण ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग लाभला. यावेळी रक्त दाब, मधुमेह तपासणी, इसिजी, नेत्र तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आखवणे भोम कृती समिती अध्यक्ष आकाराम नागप, सचिव डॉ. जगन्नाथ जामदार, भाजपा तालुका उपाध्यक्ष अभय कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी तलाठी श्रीमती भालेकर, मुख्याध्यापक श्री. पाटणकर, संतोष नागप, मनोज नागप, बबन जाधव, स्वयंसेविका रुचिता कांबळे, संचिता सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!