वैभववाडी (प्रतिनिधी) : सडूरे राववाडी येथील केशव अनंत रावराणे हे 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नापत्ता झाले आहेत. याबाबत त्यांची पत्नी कल्पना केशव रावराणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
केशव हे गाई म्हशीची खरेदी विक्री करतात. गुरे सांभाळाने हा त्यांचा दिनक्रम असतो मात्र 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता गुरे चरणीसाठी न सोडता कामाला जातोय असे घरात सांगून घराबाहेर पडले होते. ते परत आले नाहीत.
घरातील कुटुंबियांनी त्यांची सर्व नातेवाईकांकडे शोध चौकशी केली मात्र गेल्या दोन दिवसात त्यांचा कुठेच शोध लागला नाही. त्यामुळे त्यांची पत्नी कल्पना यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार श्री.साबळे करीत आहेत.
सडूरे राववाडी येथील केशव अनंत रावराणे नापत्ता












