नृत्य कला व्यक्तीला चिरंतन आनंदी ठेवत असते-सॅड्रिक डिसोजा
खारेपाटण (प्रतिनिधी): “विविध कला ह्या माणसाच्या व्यक्तिमत्व विकास वाढीसाठी मदत करत असतात.परंतु नृत्य कला ही व्यक्तीला संपूर्ण जीवनात चिरंतन आनंदी ठेवत असते.” असे भावपूर्ण उद् गार प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सॅड्रिक डिसोजा यांनी खारेपाटण हायस्कूल येथील नृत्य शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले. पंचशील विकास मंडळ खारेपाटण व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण आणि सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने खारेपाटण हायस्कूल च्या कै.चंद्रकांत परीसा रायबागकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या नृत्य शिबिराचे उद्घाटन आज खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या शूभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.या कार्यक्रमाला पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटणकर खारेपाटण हायस्कूलचे मुख्यध्यापक संजय सानप सर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण सारख्या ग्रामीण भागात नृत्य कला शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याने व त्याला सॅड्रिक डिसोजा सारखा प्रसिद्ध उत्तम डान्स कलाकार मार्गदर्शन करनार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन आपल्या गावातून चांगले कलाकार निर्माण व्हावेत.अशी सदिच्छा सरपंच प्राची इसवलकर यांनी व्यक्त करत नृत्य शिबिराला शुभेच्छा दिल्या. यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्यध्यापक संजय सानप सर यांनी देखील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण हायस्कूल नेहमीच अशा कार्यक्रमास प्रोत्साहन देत आले असून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना या निमित्ताने वाव मिळणार असल्याचे मार्गदर्शन करताना सांगितले. खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेले हे नृत्य शिबिर सलग १५ दिवस चालणार असून आज फ्री वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये खारेपाटण सह आजूबाजूच्या गावातील शालेय विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहभाग घेतला होता.तर उद्या दि.१७ पासून नियमित डान्स क्लास सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत दि.३० एप्रिल २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. तर तरी ज्या विद्यार्थ्यांना युवक युवती यांना या नृत्य शिबिरात अजूनही सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी सॅड्रिक डिसोजा यांच्याशी 8624830027 दूरध्वनीवरून संपर्क साधावा.असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पाटणकर यांनी केले तर संपूर्ण. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक संतोष राऊत सर यांनी मानले.