शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २० एप्रिल पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह

८व्या वर्धापन दिनानिमित्त २० ते २७ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल, टेंबवाडी, येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. २०एप्रिल २०२३ ते गुरुवार, दि. २७ एप्रिल २०२३ या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन गुरुवार, २० एप्रिल रोजी सकाळी ९ वा. कणकवली तहसिलदार आर. जे. पवार व ह.भ.प. काशिनाथ फोकमारे महाराज, शेगाव यांच्या हस्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग, सर्व वारकरी व शिरवल गावातील समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दररोज सकाळी ५ ते ६.३० – काकड आरती, सकाळी ६.३०ते ७.३० – `श्रीं’ची महापूजा, सकाळी ८ ते १२ – ग्रंथवाचन, दुपारी १२.३० ते २ – महाप्रसाद,  दुपारी ३ ते ५ – ग्रंथवाचन, सायं. ६-३० ते ७.३० – हरिपाठ, रात्रौ ८ ते १० – किर्तन आणि रात्रौ १० नंतर महाप्रसाद असे कार्यक्रम होतील. त्याचप्रमाणे या सप्ताहात २०एप्रिल रोजी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज (शिरवल), २१एप्रिल – ह.भ.प. रमाकांत गायकवाड महाराज (फोंडा, हरकुळ), २२ एप्रिल – ह.भ.प. रविंद्र तटकरे महाराज (रायगड),  २३ एप्रिल – ह.भ.प. श्रीकृष्ण घाटे महाराज (देवगड), २४एप्रिल – ह.भ.प. संभाजी चव्हाण महाराज (कोल्हापूर), २५एप्रिल – ह.भ.प. प्रभाकर फुलसुंदर महाराज (पुणे) यांची किर्तनसेवा होईल.२५ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३०ते ५.३० वा.पर्यंत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे

२६ एप्रिलला मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी ५:३०ते६:३०काकड आरती झाल्यानंतर ६-३० ते ८-३० – अभिषेक व महापूजा, ९ ते १२ – ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ३ – महाप्रसाद आणि त्यानंतर ४ ते ६ या वेळेत शिरवल ग्रामदैवत श्री. रवळनाथ मंदिरापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. त्यानंतर ६-३० वाजता विठ्ठल मंदिरात दीपोत्सव आणि रात्री ८ते १०या वेळेत ह.भ.प. काशिनाथ महाराज फोकमारे यांची कीर्तनसेवा होईल. तसेच २७ एप्रिल रोजी सकाळी ९-३० ते ११.३० या वेळेत ह.भ.प. काशिनाथ महाराज फोकमारे यांचे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन या सप्ताहाची सांगता होईल. तरी सर्व भाविक भक्त, वारकरी यांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज आणि विश्वस्त मंडळ, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, शिरवल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर ९४२०२६१९३४यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!