वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील ११ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन वाजत गाजत मोठया उत्साहात करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया!पुढच्या वर्षी लवकर या!! गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा जय घोषाने आसमंत दुमदुमून गेले होते. ढोल ताशांचा गजरात,फटाक्यांच्या आतिषबाजीत गणपती बाप्पाना जड अंतकरणाने निरोप दिला.
तालुक्यातील गावागावात गणपती घाटावर सायंकाळी विसर्जन करण्यात आले. वैभववाडी शहरात तीन सार्वजनिक गणपतींचे विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत ढोल पथक आणी डिजेच्या तालावर मिरवणुक सुरु होती.
यामध्ये शहरातील गणेश नगर, गोपाळ नगर, व तांबेवाडी गणपती उत्सव मंडळांचा समावेश होता.या मिरवणुकीत शहरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.












