फोंडाघाट येथील अखंड हरिनाम सप्ताहला पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची भेट

डोरले कुटुंबीयांचे सांत्वन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथे श्री देव राधाकृष्ण मंदिर मध्ये आज पासून सुरू झालेल्या, अखंड हरिनाम सप्ताहला पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी धावती भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी पदाधिकारी आप्पा पारकर यांचे कडून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. दिलीप तळेकर, मनोज रावराणे, बाळा वळंजू, विनोद मोदी, तन्वी मोदी, बबन हळदिवे, सिद्धेश पावसकर, सचिन तायशेटे, संजय पावसकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोज रावराणे, दिलीप तळेकर यांनाही गौरविण्यात आले.

यापूर्वी फोंडाघाट येथील ज्येष्ठ व्यापारी नाना डोरले यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या घरी जात डोरले कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी बंडू डोरले सह फोंडाघाट मधील स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!