कणकवलीत २८ एप्रिल पासून कीर्तन महोत्सव…!

कणकवली (प्रतिनिधी) : संस्कृती संवर्धन मंच कणकवली यांच्यावतीने येथील कणकवली कॉलेजच्या पटांगणावर २८ ते ३० एप्रिलदरम्यान सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत कीर्तनमहोत्सव आयोजित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर कीर्तनकार ह. भ. प. चारूदत्त आफळे व्याख्यानरूपी कीर्तन सांगणार आहेत,अशी माहिती प्राध्यापक हरिभाऊ भिसे येथील हॉटेल साई पॅलेस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्कृती संवर्धन मंचकणकवलीचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, कार्याध्यक्ष प्रसाद देवस्थळी, उपाध्यक्ष विलास खानोलकर, सचिव परशुराम झगडे, सदस्य संजय राणे, सुहास हर्णे हे उपस्थित होते.

श्री. भिसे म्हणाले, मुंबई, पुणे यासह अन्य महानगरांमध्ये कीर्तन महोत्सव होतअसतात. त्याच धर्तीवर संस्कृती संवर्धन मंच कणकवलीतर्फे कणकवलीत पहिल्यांदाच कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर कीर्तनकार चारूदत्त आफळे हे शुक्रवार २८ रोजी सायं. ७ ते १० यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपन या विषयावर व्याख्यानरुपी कीर्तन सांगणार आहेत. शनिवार २९ रोजी सायं. ७ ते १० यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची कारकीर्द या विषयावर व्याख्यानरुपी कीर्तन सांगणार आहे. रविवार ३० रोजी सायं. ७ ते १० यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक या विषयावर व्याख्यानरुपी कीर्तन सांगणार आहे. श्री. आपळे हे आपल्या कीर्तनरूपी व्याख्यानांतून शिवरायांचा खरखुरा इतिहास सांगणार आहेत. कीर्तन महोत्सवासाठी जिल्ह्याभरातून २००० लोक येण्याची शक्यता आहे. त्यांच्या बैठकीची व्यवस्था कणकवली कॉलेजच्या पटांगणावर करण्यात येणार असून कीर्तन महोत्सवाला शहरातील माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या कीर्तन महोत्सवात सिंधुगर्जना ढोल पथकाचे सर्व सदस्य स्वयंसेवकांची भूमिका बजवणार आहेत.कीर्तन महोत्सव विनामूल्य असून या महोत्सवासाठी आर्थिक खर्च आहे.हा खर्चभागवण्यासाठी दानशूर लोकांनी संस्कृती संवर्धन मंचला मदत करावी. तसेच या ऐतिहासिक कीर्तन महोत्सवाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनी, तरुण, तरुणींनी, कीर्तनप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन संस्कृती संवर्धन मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!