बालस्नेही गाव संकल्पांतर्गत उपक्रम
समर कॅम्प आयोजन करणारी कलमठ ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायतीच्यावतीने दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून २ दिवस चालणाऱ्या या कॅम्पमध्ये अनेक उपक्रम आणि हस्तकला मार्गदर्शन तज्ञ करणार आहेत. यामध्ये सांगित संवाद- सांगित विशारद प्रियंका मुसळे, रंगरेषा -कला शिक्षक प्रवीण चिंदरकर,हनुमत तांबट,क्राफ्टिंग-हरिश्चंद्र सरमळकर,स्वसरंक्षण- भालचंद्र कुलकर्णी,अभिनय ,संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास- निलेश पवार सिनेअभिनेते, योगा प्रशिक्षण- प्रमोद लिमये, हस्ताक्षर मार्गदर्शन-अभिजीत राणे ,मातीकला-कृष्णा गोठणकर, नृत्य प्रशिक्षण- एस.के डांस अकादमी, स्वच्छता विषयक जनजागृति व संवाद-संदिप पवार, स्वच्छ भारत मिशन अशा तज्ञ मार्फत मार्गदर्शन मिळणार असून २० एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी व अधिक माहितीसाठी श्रीकांत बुचडे, प्रमोद पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायत कलमठच्या वतीने करण्यात आले आहे.












