कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२५ प्राथमिक शिक्षक विनायक जाधव यांना देण्यात आला. याबद्दल श्री. जाधव यांचे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ कणकवलीच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महेंद्र चव्हाण असे म्हणाले की आपले समाजबांधव विनायक जाधव यांना मिळालेला उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार हा चर्मकार समाजाला आदर्श देणार आहे. आपल्या समाजामध्ये हा पुरस्कार मिळयाची आमची भावना आहे. त्याबद्दल आम्हा सर्वांना आपला अभिमान वाटतो. आपल्यासारखे शिक्षक घडले पाहिजेत आणि समाजासमोर असा आदर्श ठेवला पाहिजे. अनेक विद्यार्थी घडविणारे शिक्षक आपल्या समाजातून निर्माण व्हावेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपून समाज कार्यातही आपला ठसा उमटवावा. त्याप्रमाणे श्री. जाधव यांनी आपले कार्य शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अतिशय उत्कृष्ट असे केलेले आहे असे अभिनंदन करताना ते बोलत होते. यावेळी तालुका संघटना सचिव मंगेश आरेकर, कोषाध्यक्ष सत्यविजय जाधव, आनंद जाधव, नितीन पवार, सदानंद कदम प्रशांत फोंडेकर इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विजेते विनायक जाधव यांचा चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार












