फाेंडाघाट (प्रतिनिधी) : दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णवेध मिळविणारी मनस्या फाले हिचा माजी सभापती मनोज रावराणे यांनी तिच्या घरी जाऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी मनस्याचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, अन् लोरे नं. १ येथे होणाऱ्या स्थानिक कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान स्वीकारण्यासाठी येण्याचे निमंत्रणही मनस्याला देण्यात आले.या प्रसंगी राजन चीके,अन्य सहकारी, मनस्याचे आई-वडील तसेच ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.












