भवानी रामेश्वर डंपर सर्व्हिस मालक वाळू व्यावसायिक मनोज हडकर यांच्या वतीने पुरस्कृत

बुवा गुंडू सावंत विरुद्ध बुवा दिनेश वाघदेकर यांच्यात रंगणार डबलबारी भजनाचा सामना

आचरा (प्रतिनिधी) : ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे येथे ३९ दिवसाचा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे‌. या निमित्ताने आज भवानी रामेश्वर डंपर सर्व्हिसचे मालक वाळू व्यावसायिक मनोज हडकर पुरस्कृत ट्वेंटी ट्वेंटी डबलबारी भजनाचा जंगी सामना आज बुधवार १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता आचरा रामेश्वर मंदिर येथे रंगणार आहे. श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ, वर्देचे बुवा गुंडू सावंत यांना पखवाज साथ विराज बांवकर, तबला साथ संकेत गोसावी विरुद्ध डूंगो प्रासादिक भजन मंडळ, शेळपी-वेंगुर्ले बुवा. दिनेश वागदेकर पखवाज-सचिन राणे, तबला-अजित मार्गी करणार आहे. तरी भजन रसिकांनी डबलबारी भजनाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!