सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टविरोधात भाजपकडून पोलिसांना निवेदन

खासदार-आमदारांवरील पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : खासदार, आमदार यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया ग्रुप वर कारवाई करण्याची मागणी तालुका भाजप कडून करण्यात आली आहे. वैभववाडी कोकण रेल्वे प्रवाशी संघटना ग्रुप वर या पोस्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

रेल्वे प्रवाशी व इतर समस्याबाबत चर्चा करताना वैभववाडी कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेच्या ग्रुप वर खासदार आमदार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या ग्रुप वर खासदार आमदार यांच्याबाबत गेले काही महिने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे खासदार आमदार यांची नाहक बदनामी केली जात आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, बंड्या मांजरेकर, भाजयुमो चे अध्यक्ष अतुल सरवटे, संजय चव्हाण, सुहास सावंत, राजेंद्र राणे, रोहन रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!