पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत स्वच्छता मोहीम

वैभववाडी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा होत आहे. यानिमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहीमेचे उद्घाटन वैभववाडी बसस्थानकात करण्यात आले. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, संजय सावंत, प्रदीप रावराणे, अतुल सरवटे, रितेश सुतार, प्राची तावडे, बंड्या मांजरेकर, राजेंद्र राणे, नेहा माईणकर, प्रकाश पाटील, महेश संसारे, नवलराज काळे, संजय चव्हाण, विलास नावळे, भीमराव भोसले, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसस्थानक, संभाजी चौक, बाजारपेठ तसेच अन्य ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

error: Content is protected !!