आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमन पदी निवड झाल्यापासून खरेदी विक्री संघाच्या उन्नतीसाठी तसेच भारत गॅस, उज्ज्वला गॅस ग्राहकांनसाठी करत असलेले राजन गांवकर यांचे काम कौतुकास्पद असून ते तळागाळात जाऊन काम करत आहेत याचा अभिमान आहे असे गौरवोद्गार भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी चिंदर ग्रामपंचायत येथे आयोजित एलपीजी गॅस कार्यक्रमात काढले.
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, चिंदर ग्रामपंचायत आणि श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने एलपीजी पंचायत कार्यक्रमाचे आयोजन शनिवार २० सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी भारत गॅस, उज्ज्वला गॅस मार्गदर्शन ग्राहकांना करण्यात आले व भारत गॅस केवायसी करण्यात आली. याला भारत गॅस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपसरपंच महेंद्र मांजरेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, विवेक परब, अशोक बागवे, व्यवस्थापक शेलटकर, श्रीधर चिंदरकर, रोहित पाटील, तुषार पवार, संजय लोके, अजिंक्य सुर्वे, गावडे, देसाई आदी महिला वर्ग उपस्थित होते.











