कणकवली (प्रतिनिधी) : समाजभुषण पुरस्कार प्राप्त संदीप चाैकेकर मित्रमंडळाच्यावतीने शिरवल खासकीलवाडी येथे नवरात्राेत्सव साजरा करण्यात करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने शिरवल खासकीलवाडी येथील युवक दुर्गामातेची प्राणप्रतिष्ठा करून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो
दि.22 सप्टेंबर राेजी सकाळी 10 वाजता घटस्थापना, दुपारी १२ वा. तिर्थप्रसाद, सायंकाळी ८ वा. संगीत भजन-बुवा मकरंद माेडक, त्यानंतर रात्री ९.३० वाजता भजन (बुवा श्रीकांत शिरसाठ) वा.सुप्रसिद्ध बुवा श्रीकांत शिरसाट यांचे भजन हाेणार आहे.दि 23 सप्टेंबर राेजी सायंकाळी 8 वा भजन (गायिका अंकिता गावडे)
२८सप्टेंबर दुपारी १वाजता भंडारा (महाप्रसाद), सायंकाळी ४वाजता हळदीकुंकू, संध्याकाळी ८ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता भजन जुगलबंदी सामना श्री. मालवीर भूथनाथ महा. भ. मंडळ पाळेवाडी, देवगड बुवा शुभम पाळेकर, विरुद्ध श्री पडेलकर प्रासादिक भजन मंडळ धालवली, देवगड बुवा अखिलेश फाळके यांचा २० × २० डबलबारी भजन सामना आयोजित करण्यात आला आहे.
भाविकांनी भक्तांनी आणि भजन रसिकांनी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












