पोंभुर्ले गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी किशोर कांबळे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी पोंभुर्ले गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते किशोर शंकर कांबळे यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

पोंभुर्ले ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच गावच्या सरपंच प्रियांका धावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. या सभेमध्ये गावच्या म. गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा किशोर कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी उपसरपंच सादीक डोंगरकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक पाडावे, पोलिस पाटील राखी मोंडे, पुरूषोत्तम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

किशोर कांबळे हे देवगड तालुका बौध्दजन सेवा संघाचे माजी अध्यक्ष तसेच या संघटनेचे बौध्दाचार्य म्हणून बौद्ध धम्माचे प्रसार आणि प्रचाराचे धम्मसंस्कार विभागाचे कामकाज सांभाळत असून त्यांना पोंभुर्ले बौद्धजन उन्नती मंडळाचे देखील बहुमोल सहकार्य लाभत आहे. सामाजिक आवड असणारे किशोर कांबळे यांचे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!