कोकण रेल्वेप्रश्नासंदर्भात पालकमंत्री नितेश राणेंनी केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांची दिल्लीत घेतली भेट

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग, रेल्वे स्थानक आधुनिकीकरण, एक्सप्रेस ना सिंधुदुर्गात थांबा सह मांडल्या अन्य समस्या

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मंत्री नितेश राणेंना सकारात्मक प्रतिसाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत सिंधुदुर्ग व कोकणातील कोकण रेल्वेबाबत च्या महत्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा केली. केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांच्या भेटीमध्ये वैभववाडी – कोल्हापूर या नूतन रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्याची विशेष मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली.

त्याचसोबत कोकणातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, सिंधुदुर्ग व परिसरातील स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, कोइमतूर, नागरकोइल व मडगाव एक्सप्रेसचा कणकवली येथे थांबा, मांडवी एक्सप्रेसचा नांदगाव येथे थांबा, मडुरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या सोडणे, पीआरएस काउंटर, प्रवासी सुविधा उन्नतीकरण याबाबत सकारात्मक चर्चा केली केली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सदर मागण्या व प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्याची ग्वाही दिली.

error: Content is protected !!